Table of Contents
सध्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे कोणीही उठतो आणि अंदाज देतो त्यामुळे याचा फटका काही शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे ते शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि खोटा हवामान अंदाज देणाऱ्या बद्दल कायदेशीर रित्या तक्रार करणार आहेत तर ते शेतकरी कोण आहेत ते आपण पाहूया.
हवामान अंदाजाची शेतीला किती गरज आहे?
शेतकरी शेतात राबराब राबतो आणि अवकाळी पाऊस आणि गारा त्याच्या तोंडातला घास हिरावून घेतो त्यामुळे अंदाज हा शेतकऱ्यांसाठी समजणे खूप गरजेचे आहे.भारतातील शेती ही मुख्यत्वे निसर्गावर अवलंबून आहे वाढतं प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे अवकाळी पाऊस, अनवेळी पडणाऱ्या गारा, पावसाळ्यात पाऊस न पडणे, यासारख्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे हवामान अंदाजाची भारतीय शेतीला खूप जास्त गरज आहे हवामान अंदाज यामुळे शेतीची कामे, शेतकरी हवामानाच्या अंदाजानुसार करू शकतो किंवा तो त्या तयारीत राहू शकतो त्याचा असा फायदा होतो की अवकाळी पावसामुळे किंवा गारामुळे त्याचं पुढील होणारे नुकसान टाळता येतं. त्याच्यामुळे आजचे हवामान अंदाज हा शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी खूप फायदेशीर आहेच.जर एखादी पीक काढणीला आलेले असेल आणि जर का पावसाचा अंदाज असेल तर शेतकरी ते पीक काढून व्यवस्थित सुरक्षित जागी ठेवू शकतो किंवा काढणीला उशीर करू शकतो किंवा लागलीस ते भरडून घेऊ शकतो त्यामुळे हवामानाचा अंदाज माहित असणे खूप गरजेचे आहे.
हवामान अंदाज खरे ठरतात का?
आज-काल महाराष्ट्रात गल्लोगल्ली अंदाज देणारे तज्ञ जन्माला आलेले आहेत,आणि ते त्यांचे यूट्यूब चैनल चालवण्यासाठी ते दररोज वेगवेगळे अंदाज देत आहेत. यामुळेच खरी समस्या तयार झालेली आहे. आपण जर त्यांची यूट्यूब चैनल पाहिले तर त्याची हेडिंग असते ती म्हणजे आज हे जिल्हे बुडणार, येथे होणार पाणीच पाणी आणि प्रत्यक्षात मात्र पाण्याचा एक थेंबही पडत नाही शेवटी हा एक अंदाज आहे पण त्या अंदाजात पण काहीतरी तथ्य असले पाहिजे अंदाज हा मिळता-जुळता असला पाहिजे. अंदाज हा पूर्ण जिल्ह्यासाठी नसून हा अंदाज दहा किलोमीटरच्या एरियापर्यंतच दिला गेला पाहिजे, पण सध्या जे येत्या 48 तासात हवामान अंदाज किंवा लाईव्ह हवामान अंदाज मिळत आहेत त्याच्यातले बरेचसे अंदाज हे फेल होत आहेत, त्या अंदाजानुसार पाऊस पडत नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही.
या शेतकऱ्यांनी दिलाय गुन्हा दाखल करण्याचा इशारा-
महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक,डाळिंब उत्पादक, पेरू उत्पादक, सीताफळ उत्पादक शेतकरी यांनी जर हवामान देणाऱ्या व्यक्तीने दिलेला हवामान अंदाज जर खोटा निघाला तर त्याच्या विरोधात फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर का द्राक्ष हार्वेस्टिंग च्या वेळेस जर पावसाचा अंदाज दिला तर त्याचा हार्वेस्टिंग वर परिणाम होतो आणि अर्थातच त्यांच्या उत्पन्नावर आणि आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होतो. कारण जर का अवकाळी पाऊस पडणार असेल तर व्यापारी त्यांच्या मालाला म्हणजे द्राक्षाला भाव पाडून मागतात किंवा शेतकरी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचा माल कमी भावात विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या नुकसान होतं. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज प्रत्येक जणांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि भारतीय हवामानाचा अंदाज त्यांच्याकडे येत राहतात किंवा त्यांच्याकडे वेगवेगळे ॲप आहेत त्याच्याहून ते अंदाज पाहू शकतात ,तरी या गल्लीबोळातील हवामान तज्ञांनी शेतकऱ्यांना घाबरवू नये. कारण हे गल्लीबोळातील तज्ञ त्यांचे युट्युब चॅनेल चालावे म्हणून ते कधीही ,आणि काहीही आजचा हवामान अंदाज देतात जर का त्यांचे तुम्ही Youtube चैनल पाहिले तर आज या जिल्ह्यातील ही गावे बुडणार, आज येथे पडणार एवढा पाऊस अशा प्रकारचे पोस्ट असतात. त्यामुळे अशा हवामान तज्ञांच्या विरोधात शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इशारा दिलेला आहे
काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
सुरेश सांगतात यूट्यूब द्वारे हवामान अंदाज महाराष्ट्र त सांगणारे तज्ञांचा सहसा सुळसुळाट झाला आहे शेतकरी व शेती यांचं खूपच नुकसान होत आहे सरकारने या नकली हवामान तज्ञांचा बंदोबस्त केला पाहिजे.
अब्दुल सांगतात भारतीय हवामान खात्याचा अंदाज देखील चुकीचा आहे तर त्यांच्यावर ही कारवाई करणार का? सरकार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार का?
रामभाऊ सांगतात आम्ही हवामानाच्या अंदाजाने अंदाजानुसार शेतातली कामे उरकून घेतो त्यामुळे आम्हाला याचा फायदा होतो.
हवामान तज्ञ सांगतात हवामान अंदाज हे वाऱ्याची दिशा, वेळ याच्यावर अवलंबून असते, वाऱ्याच्या दिशेत बदल झाला की अंदाजात देखील बदल होतो. ते एक ठराविक जिल्ह्यातील भागांमध्ये दिले गेलेले असतात , जर का एखाद्या जिल्ह्यासाठी हवामान अंदाज दिला तर तो पूर्ण जिल्ह्यासाठी लागू होत नाहीये तो फक्त त्या एरियासाठीच लागू होतं त्यामुळे शेतकऱ्यांनीही हवामान बदल समजून घेणे गरजेचे आहे.
राजमा/ पावटा Kidney bean बाजार भाव कितना बढ़ेगा येथे क्लिक करा